मावशी सोबत ‘तो’ करयाचा घडफोड्या; अट्टल आरोपी अखेर गजाआड

एक सराईत गुन्हेगार त्याच्या मावशी सोबत घरफोडी गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरी करतांना शॉक लागून मावशीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल वसूल केला आहे. Inpoliceinvestigation Crime Record criminal house theft with his unty , police recovered five lakhs property from criminal


विशेष प्रतिनिधी

पुणे : मावशीच्या मदतीने घरफोड्या करणा-या एका अटट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. गुन्ह्यात मदत करणारी त्याच्या मावशीचा चोरी करतांना गेल्या आठवड्यात शॉक लागून मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका घरफोडीच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडूून सोने-चांदीच्या दागिण्यांसह ४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन देविदास बनसोडे (वय २१, रा. लेन नबर ७, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) असे अट करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट ६ कडून समांतर तपास सुरू होता. हा गुन्हा आरोपीने त्याच्या मृत मावशी सोबत मिळून केला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.



त्यानुसार आरोपीचा शोध पोलिस घेत होते. रविवारी (दि ९) बनसोडे याचा शोध घेत असताना तो पाटील इस्टेट पुलाच्या खाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत असतांना त्याची चौकशी पोलिसांनी केली. यावेळी त्याने त्याच्या मावशी सोबत पुणे शहरामध्ये, लोणीकंद, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन व समर्थ, सिंहगड रोड व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून गुन्ह्याततील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९६ हजार ८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गुन्ह्यातील सहआरोपी त्याची मावशी चार महिन्यांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रीक शॉक लागुन मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले आहे.

Inpoliceinvestigation Crime Record criminal house theft with his unty , police recovered five lakhs property from criminal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात