उत्तर प्रदेशात 403 जागांवर राणा भीमदेवी थाट आणणारी शिवसेना 100 जागांवर उतरली 

वृत्तसंस्था 
मुंबई : उत्तर प्रदेशात भाजपला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व म्हणजे विधानसभेच्या 403 जागांवर निवडणूक लढवण्याची राणा भीमदेवी थाट करणारी शिवसेना अखेर 100 जागांवर उतरली आहे. उत्तर प्रदेशात 100 जागा लढविण्याची घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत केली आहे. In Uttar Pradesh, Shiv Sena, which had fielded Rana Bhimdevi for 403 seats, came down to 100 seats
याच्या आधी शिवसेनेचे उत्तर प्रदेशातील नेते विश्वजीत सिंह यांनी राज्यात सर्वच्या सर्व म्हणजे 403 जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या लेटरहेडवर शिवसेनेच्या या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. प्रसार माध्यमांनी देखील त्यांच्या माहितीच्या आधारे शिवसेना-भाजपला प्रचंड मोठे आव्हान देणार अशा थाटाच्या बातम्या रंगवल्या होत्या.
परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातल्या आपल्याच नेत्याच्या वक्तव्यातली हवा काढून घेऊन शिवसेना उत्तर प्रदेशात 100 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर शिवसेना  गोव्यात 20 जागांवर लढविण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. समविचारी पक्षाबरोबर शिवसेना आघाडी करण्याची शक्यताही संजय राऊत यांनी बोलून दाखविली भाजपचा गुजरातमधला नेतृत्वाचा फेरबदल  हा त्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

In Uttar Pradesh, Shiv Sena, which had fielded Rana Bhimdevi for 403 seats, came down to 100 seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात