सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिनी प्लॅस्टिक फुलांच्या आयातीवर बंदीची राजू शेट्टींची मागणी


प्रतिनिधी

नवी दिल्ली : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर चिनी माल बाजारात येतो. त्याचा फटका भारतीय उत्पादकांना, वितरकांना आणि विक्रेत्यांना बसतो. हळूहळू चिनी माला विरुद्ध भारतात मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे. या पार्श्वभूमीवर चिली बनावटीच्या कृत्रिम फुलांच्या आयातीवर आणि वापरावर बंदी घालावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पर्यावरण केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.In the background of public Ganeshotsav Raju Shetty demands ban on import of Chinese plastic flowersभूपेंद्र यादव यांना दिलेल्या निवेदनात राजू शेट्टी म्हणतात : चिनी बनावटीचे प्लॅस्टीक कृत्रिम फुलामुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लॅाकडाऊनच्या संकटानंतर देशाच्या बाजारपेठेत स्थिर स्थावर होण्याच्या प्रयत्नात असणा-या फुल उत्पादकांना देशातील बाजारपेठेत वाढलेल्या चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक फुलांच्या आयातीमुळे पुन्हा एकदा देशातील फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागल्याने केंद्र सरकारने चीनी कृत्रिम प्लॅस्टीक फुलांच्या वापरावर आणि आयातीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांचेकडे केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि अन्य शाळांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता चिनी बनावटीच्या मालासंदर्भात नेमका काय निर्णय घेते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

In the background of public Ganeshotsav Raju Shetty demands ban on import of Chinese plastic flowers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात