नाशिक : या महाराष्ट्रात पर्यायी म्हणजे “कार्यभारी” मुख्यमंत्री नेमके आहेत तरी किती?, हा प्रश्न आता तयार झाला आहे. एकापाठोपाठ एक “कार्यभारी” मुख्यमंत्र्यांची नावे महाराष्ट्रासमोर आणली जात आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजिबात विचलित न होता आपले अधिकृत निवासस्थान वर्षावरून महाराष्ट्राचा “राज्य गाडा” हाकताना दिसत आहेत…!!In Maharashtra, there are many alternatives to the Chief Minister
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यांचे मोठे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांनी सध्या तरी घरातून म्हणजे आपल्या अधिकृत निवासस्थान वर्षामधून राज्याचा कारभार करण्याचे ठरवले आहे. मात्र, विधिमंडळाच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सभागृहामध्ये कधी येतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्री पाचही दिवसांत विधिमंडळाचे फिरकले नाहीत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मात्र त्यांनी अचानक परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत विधिमंडळात येऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्याच्या बातम्या आल्या. परंतु मुख्यमंत्री संपूर्ण अधिवेशन काळात विधिमंडळात आले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्र्यांनी कार्यभार कोणाकडे तरी सोपवावा अशा अनेक सूचना केल्या. यामध्ये अनेकांची नावे अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना “कार्यभारी” म्हणजे “कार्य वाहणारे मुख्यमंत्री” म्हणून सुचवून घेतले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नावे अर्थातच आघाडीवर होती. त्यातही आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव असल्याने त्यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. त्यानंतर अजित पवार यांचे नाव होते. कारण ते उपमुख्यमंत्री आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर आपले राष्ट्रवादीवरचे प्रेम न लपवता अजित पवारांना कायमच विधिमंडळ अधिवेशनापुरते मुख्यमंत्री करा. इतर वेळेला तुमच्या बाबांकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार राहू द्या, असा सूचना चिमटा आदित्य ठाकरे यांना काढून घेतला.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तर सगळ्यांवर कडी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्याची सूचना उद्धव ठाकरे यांना केली. भाजपच्या काही नेत्यांनी त्यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचा कोणावरच विश्वास नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नी रश्मी यांना मंत्री करावे आणि त्यां ज्येष्ठ मंत्री करून त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवावा, अशी सूचना करून घेतली.
आज दुसरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्य मंत्रीपदाचा कार्यभारात जोडून दिले. एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेची तारीफ करत त्यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्याकङे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवला पाहिजे. कारण मुख्यमंत्रिपदाचा शिवाय राज्याचा गाडा चालणार कसा?, असा सवाल रावसाहेब पाटील दानवे यांनी करून घेतला.
या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेची या राज्यांमध्ये पर्यायी म्हणजे कार्यभारी मुख्यमंत्री आहेत तरी किती? हे समजले…!!
मुख्यमंत्री आजारी असले तरी वर्षावरून कार्यभार सांभाळतात. ऑनलाईन बैठका घेतात. न दमता, न थकता मंत्र्यांना – अधिकाऱ्यांना सूचना देतात. आढावा घेतात. इतकेच नव्हे तर मुंबईच्या जनतेला 500 स्क्वेअर फूट पर्यंत घरांवरील करमाफीचे गिफ्टही देऊन टाकतात. तरी देखील “कार्यभारी” मुख्यमंत्र्यांची चर्चा मात्र महाराष्ट्रात थांबताना दिसत नाहीत…!!
आता ही चर्चा थांबतच नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी एक राजकीय सूचक उद्गारही काढून घेतले. आदित्यने माझा बराच ताण हलका केला, असे ते म्हणाले. त्यांच्या या उद्गारांनी नंतर तरी “कार्यभारी” मुख्यमंत्र्यांभोवतीची चर्चा थांबणार? की ती अधिक वाढणार? हे येणारा काळच ठरवेल…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App