काँग्रेसचे मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांचा भ्रष्टाचार त्यावेळी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाचे संपादक असलेल्या अरुण शौरी यांनी उघड केला होता. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास सर्वात महत्वाचा पुरावा शरद पवार यांनी दिला होता. शोरी यांच्याकडे तो प्रत्यक्षात आता हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष असलेल्या अजित गुलाबचंद यांनी पोहोचविला होता.
विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांचा भ्रष्टाचार त्यावेळी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाचे संपादक असलेल्या अरुण शौरी यांनी उघड केला होता. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास सर्वात महत्वाचा पुरावा शरद पवार यांनी दिला होता. शोरी यांच्याकडे तो प्रत्यक्षात आता हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष असलेल्या अजित गुलाबचंद यांनी पोहोचविला होताImportant evidence against Congress Chief Minister Antulay was given by Sharad Pawar, delivered by Ajit Gulabchand
स्वतः अरुण शौरी यांनी आपल्या आत्मचरित्रात हा गौप्यस्फोट केला आहे. शौरी यांचे द कमिशनर फॉर लॉस्ट कॉसेसe Commissioner For Lost Causes) हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये त्यांनी अंतुले यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानचा माध्यमातून केलेला भ्रष्टाचार कसा उघड केला हे लिहिले आहे. शौरी यांना माहिती मिळाली मात्र साखर कारखाने आणि सिमेंट कंपन्या यांच्याकडून वसुली करण्याचे परिपत्रक मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्याच्याकडून हा पुरावा मिळाला.
शौरी यांनी लिहिले आहे की, रामनाथजी म्हणाले, ‘उस बदमाश के पास जाओ, शरद पवार के पास. वो सब चिनी मिलों का कर्ता धरता है।’त्या काळात शरद पवार हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे विरोधी पक्षनेते होते. मला संध्याकाळची अपॉइंटमेंट मिळाली. त्याच्या घराचा व्हरांडा आणि समोरची खोली माणसांनी भरलेली होती. त्यांनी माझे असे स्वागत केले, जणू आम्ही एकमेकांना कायमचे ओळखत आहोत.
मी प्रकल्पाची माहिती दिली, मला काय माहिती मिळाली आहे ते सांगितले. मात्र साखर कारखानदार आणि सहकारी संस्थांना अंतुले यांनी पाठवलेले परिपत्रक मिळाले नाही असे सांगितले. ते म्हणाले, एवढंच? सिमेंट आणि साखर कारखान्यांकडून काय घेतले गेले. प्रत्येक गिरणी मालकाकडून किती पैसे घ्यायचे यासाठी कोणते सूत्र निश्चित केले गेले हे तुम्हाला आधीच माहित आहे. मग तुम्ही बातमी का देत नाही तुम्हाला प्रत्यक्ष परिपत्रकाची गरज का आहे?
मी त्यांना सांगितले की हा माझा मार्ग नाही. जोपर्यंत माझ्या हातात परिपत्रक येत नाही तोपर्यंत मी बातमी प्रकाशित करणार नाही.पवार म्हणाले, प्रकाशित करणार नाहीस? RNG ना (रामनाथ गोएंका) याबद्दल माहिती आहे का?मी कुठे राहतोय हे विचारून त्यांनी मला परत जायला सांगितले, माझ्याकडे परिपत्रक असल्याप्रमाणे बातमी लिहायला सुरुवात करा आणि परिपत्रक घेऊन कोणीतरी त्या रात्री पेंटहाऊसमध्ये येईल, असे सांगितले. रात्री उशिरा एक तरुण सायकलोस्टाइल परिपत्रक घेऊन आला. तो तरुण होता अजित गुलाबचंद. तेच पुढे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App