‘पब चालतात, मग देखावे का नाही?’ बैठकीत संताप

Pune Ganeshotsav

विशेष प्रतिनिधी

पुणे : “शहरात पब आणि बार पहाटेपर्यंत बिनदिक्कत सुरू ठेवले जातात, मग शतकोत्तरी परंपरा असलेल्या गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिकांना पहाटेपर्यंत परवानगी का दिली जात नाही?” असा थेट आणि खडा सवाल पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका व पोलिस प्रशासनाला केला. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय पदाधिकारी, पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत कार्यकर्त्यांचा हा रोष पाहायला मिळाला.

महापालिकेच्या वतीने आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीला महापौर, सर्वपक्षीय पदाधिकारी, सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, महापालिका अधिकारी तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायद्याचे नियम फक्त उत्सवांनाच का?

बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पुण्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि पब संस्कृतीला सूट दिली जाते, मात्र भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या गणेशोत्सवातील देखावे, मिरवणुका आणि ध्वनिक्षेपकांवर मात्र वेळेची आणि नियमांची बंधने लादली जातात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. देखावे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता देखावे पहाटेपर्यंत खुले ठेवण्याची व आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

पाच दिवस रात्री १२ पर्यंत सवलत : संजय दराडे

यावर बोलताना सह पोलिस आयुक्त संजय दराडे म्हणाले, “गणेश मंडळांच्या सर्व भावना आणि मागण्या पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचवून योग्य निर्णय घेतला जाईल. यंदा १२ दिवसांचा उत्सव असून गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशीसह एकूण ५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाची शिथिलता देण्यात आली आहे. मंडळांना परवानगी मिळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबवली जाईल. मात्र, लेझर बीम आणि प्लाझ्मा यांसारख्या घातक दिव्यांचा वापर टाळण्याबाबत मंडळांचे एकमत झाले असून, उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जाईल. दहीहंडीच्या वेळेबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.”

मंडळांवर विनाकारण बंधने लादणार नाही : महापौर

महापौरांनी प्रशासनाला निर्देश देताना स्पष्ट केले की, “गणेशोत्सव हा पुण्याचा आणि महाराष्ट्राचा गौरव आहे. ‘एसओपी’ ही मार्गदर्शक तत्त्वे असावीत, मंडळांवर जाचक बंधने असू नयेत. कार्यकर्त्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवूनच उत्सव यशस्वी करावा लागेल.”

महापौरांनी बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय जाहीर केले :

एक खिडकी व डिजिटल मॅपिंग : परवानग्यांसाठी सिंगल विंडो सिस्टीम लागू केली जाईल. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्व मंडळांचे ‘गुगल मॅपिंग’ आणि क्यूआर कोड तयार केले जातील.

शुल्क व दंडाला पूर्ण माफी : उत्सवाच्या काळातील जाहिरात कमानी, प्रायोजक फलक आणि खाद्यपदार्थ-पाण्याच्या स्टॉल्सवर कोणतेही महापालिका शुल्क अथवा दंड आकारला जाणार नाही.

नागरी सुविधा : शहरातील खड्डे तातडीने बुजवले जातील. भाविकांसाठी फिरती स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.
नोडल अधिकारी : मंडळांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निवारण करण्यासाठी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र ‘नोडल ऑफिसर’ नियुक्त केले जातील.

या वेळी पोलिसांनी बॅरिकेडिंग करताना कोणत्याही मंडळाचा देखावा झाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.गरिबी”

If pubs can operate, why not religious processions?”  Outrage at the meeting. : Pune Ganeshotsav

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात