• Download App
    Heavy Rain Damages Crops 29 Districts, Aid To Be Given Urgently अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात,

    Heavy Rain : अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, तातडीने मदत देणार; कृषी मंत्री भरणेंची माहिती

    Heavy Rain

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Heavy Rain महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.Heavy Rain

    कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात १४, लाख ३६ हजार २७६ हेक्टर क्षेत्र (३५ लाख ९० हजार ६०९ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहेHeavy Rain



    सर्वाधिक बाधित जिल्हे:

    नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर
    वाशीम – १,६४,५५७ हेक्टर
    यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर
    धाराशिव – १५०,७५३
    बुलडाणा – ८९,७८२ हेक्टर
    अकोला – ४३,८२८ हेक्टर
    सोलापूर – ४७,२६६ हेक्टर
    हिंगोली – ४०,००० हेक्टर
    बाधित पिके
    सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

    एकूण बाधित जिल्हे

    नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

    मदत तातडीने देण्यात येईल – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

    मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

    Heavy Rain Damages Crops 29 Districts, Aid To Be Given Urgently

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani बँक ऑफ बडोदाकडून अनिल अंबानी, आरकॉम कंपनी फ्रॉड घोषित; तिसऱ्या बँकेची कारवाई

    Raje Mudhoji Bhosale : मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण देण्यात यावे, ओबीसीतून नको; राजे मुधोजी भोसले यांची मागणी

    Mitkari : मिटकरींकडून डीएसपी अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी; IPS अधिकाऱ्याला छळले तर कोर्टात खेचेन, दमानियांचा इशारा