केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर; मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्येही मान्सून सक्रिय, अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा
देशात नैर्ऋत्य मान्सूनने अखेर दमदार हजेरी लावली असून केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळसह दक्षिण भारतातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.