Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.