दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोवॅक्सिन लसीला परवानगी दिली होती, त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते.Good news! Finally, Bharat Biotech’s covacin got WHO approval
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हैदराबादच्या भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजेच WHO ची मान्यता मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोवॅक्सिन लसीला परवानगी दिली होती.
त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते.कोवॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस आहे.एक वर्षापूर्वीच भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती.
कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटेनची परवानगी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोवॅक्सिन लस घेतलेली असेल तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर कॉरंटाईन नियमाचे पालन करावे लागत असे. पण who च्या परवानगी मुळे कॉरंटाईन नियमाचे पालन करावे लागणार नाही
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App