• Download App
    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय । Former Mumbai Police Commissioner Parambir Singh fleeing the country for fear of arrest ?; Suspicion to investigative agencies

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणामध्ये मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्येही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. Former Mumbai Police Commissioner Parambir Singh fleeing the country for fear of arrest ?; Suspicion to investigative agencies

    राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक वेळा परमबीर सिंग यांना समन्स बजावले आहे. मात्र, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. यामुळेच एनआयएला संशय आहे की, अटकेच्या भीतीपोटी परमबीर सिंग हे देश सोडून फरार झाले आहेत. एनआयएने अँटिलिया स्फोटके यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंह यांना समन्स बजावले होते.



    चार दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालकांकडून राज्याच्या गृहविभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. आता यावर गृहविभागाने संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याविषयी माहिती मागवली आहे. त्यानंतर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

    Former Mumbai Police Commissioner Parambir Singh fleeing the country for fear of arrest ?; Suspicion to investigative agencies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!