प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून मलाच सहआरोपी अथवा आरोपी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा प्रत्यारोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Fadnavis Police Inquiry
पोलिसांनी फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन दोन तासांहून अधिक काळ चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळातला बदल्या घोटाळा मी बाहेर काढला. या घोटाळ्यातील सगळी संवेदनशील कागदपत्रे मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. आता त्यावरून मला हा गोपनीयता कायद्याचा भंग असल्याचे सांगत सहआरोपी अथवा आरोपी करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न मला दिसतात. मला आधी लेखी प्रश्नावली पाठवण्यात आल्यावर त्यातले प्रश्न आणि आज विचारलेले प्रश्न यात गुणात्मक फरक आहे. आज विचारलेल्या प्रश्नांमधून ही गोष्ट स्पष्ट होते, की मी जणू काही गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केले आहे आणि ते तुम्ही का केले?, अशा स्वरूपाचे प्रश्न मला विचारण्यात आले.
वास्तविक पाहता विरोधी पक्षनेता म्हणून मला प्रिव्हिलेज आहेत. तरी देखील मी प्रिव्हिलेज वापरायचा प्रयत्न करणार नाही, असे मी जाहीर केले होते. त्यानुसार मी प्रिविलेज वापरले नाहीत आणि पोलिसांना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण यातूनच मला आरोपी अथवा सहआरोपी बनवण्याचा त्यांचा एक प्रयत्न दिसतो आहे, असे फडणवीस म्हणाले
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App