विनायक ढेरे
नाशिक : जाहिरातीवर खर्च, फरक स्पष्ट; प्रसिद्धीसाठी हापापून पाहा कोण करतेय “कष्ट”!!… हे विधान खरोखरच दोन सरकारांना लागू होते आहे. कोणतेही सरकार आपापल्या योजनांच्या जाहिराती करणे हे स्वाभाविक आहे. जनसामान्यांपर्यंत आपल्या सरकारच्या योजना पोहोचण्यासाठी त्या आवश्यकही आहेत. पण त्या जाहिराती कशा?? किती प्रमाणात आणि किती खर्चाने करायचा??, याला काही कायदेशीर मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे काही तारतम्यही आहे. पण ही कायदेशीर मर्यादा कोण पाळते त्यापेक्षा जाहिराती करण्याचे तारतम्य कोण बाळगते हे पुढे मांडलेली आकडेवारी स्पष्ट करत आहे. Expenditure on advertising, the difference is clear; Look who’s doing the hype for publicity
मोदी सरकारवर आरोप
केंद्रातले मोदी सरकार जाहिरातबाजीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करते, असे आरोप काँग्रेससह आम आदमी पार्टी आणि अन्य विरोधी पक्ष करतच असतात. परंतु या जाहिरातीच्या खर्चाच्या आकडेवारीतले तथ्य मात्र काही वेगळेच तथ्य सांगून जात आहे. मोदी सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2018 च्या आर्थिक वर्षात तब्बल 1105.01 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले होते, पण आता 2022 मध्ये हा खर्च मोठ्या प्रमाणावर घटवून 280.28 कोटी रुपये एवढा खाली आणला आहे. याचा अर्थ मोदी सरकार जसजशी वर्षे पुढे जातात तसा जाहिरातींवर वाढता खर्च करण्याऐवजी खर्चात कपात करत आहे. हे आकडेवारीने सिद्ध झाले आहे.
Difference… pic.twitter.com/8fHn5ok9cS — Satya Kumar Yadav (Modi Ka Parivar) (@satyakumar_y) August 25, 2022
Difference… pic.twitter.com/8fHn5ok9cS
— Satya Kumar Yadav (Modi Ka Parivar) (@satyakumar_y) August 25, 2022
– केजरीवाल सरकारचा जाहिरात खर्च
या उलट दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार जाहिरातींवर वारेमाप खर्च करत असल्याची आकडेवारी “द हिंदू” या दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. 2021 – 2022 या आर्थिक वर्षांमध्ये आत्तापर्यंत दिल्लीतल्या अरविंद केजरीवाल सरकारने 488.97 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. या पैकी फक्त मार्चमध्येच 125.15 कोटी रुपये एवढा खर्च जाहिरातींवर दाखवला आहे. जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणारी हीच ती आम आदमी पार्टी आहे की जिने पंजाब मध्ये काँग्रेस सरकारवर मात करून मोठे यश मिळवले आणि आता गुजरात मध्ये भाजपवर मोठा हल्ला करण्याचा मनसूबा रचत आहे. त्याच वेळी केजरीवाल सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, ज्यांच्यावर दारू घोटाळ्यात ईडीने छापे घातले आहेत, त्या सिसोदियांनी दिल्ली राज्यातील शिक्षणामध्ये कशी क्रांती घडवली आहे??, याच्या जाहिराती केजरीवाल सरकार आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये करत आहे.
केजरीवाल सरकारचा जाहिरातींवरचा हा वारंवार खर्च “हिंदू” दैनिकाने एक्सपोज केला आहे. म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे, जाहिरातीवर खर्च फरक स्पष्ट प्रसिद्धीसाठी हापापून पहा कोण करतेय “कष्ट”!!, असे म्हणावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App