विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करत नसले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराचा धडाका लावला. त्यांनी मराठवाड्यात दुष्काळ मुक्तीचा आहे का काढला!!Eknath Shinde’s campaign in the Zilla Parishad elections; Marathwada’s drought relief plan is out!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट जनसभेला संबोधित करताना या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचे सावट आहे. दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत या कठीण काळातही निवडणुका टाळता येत नसल्याने प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याचेही याप्रसंगी नमूद केले.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता, मात्र आमच्या सरकारने तो पुन्हा सुरू केला असून मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख कायमची पुसून टाकण्याचा आमचा निर्धार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
कन्नड तालुक्याला कमी निधी मिळाला असला तरीही हा बॅकलॉग आता भरून काढला जाईल. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा परिषदेवर विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, या भागाच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असा शब्द मी देतो, अशी ग्वाही देखील याप्रसंगी दिली.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास सुमारे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजना जाधव, आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व उमेदवार, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App