विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेतच म्हणून तर ते दिशा सालियन प्रकरणात मला नावे जाहीर करण्याचे आव्हान देत आहेत. पण त्यांना माहिती आहे यात त्यांचं नाव नाही, तर मातोश्रीतली नावे आहेत. त्यामुळे ती जाहीर केली हे स्वतः बाशिंग बांधून तयार आहेत अशा शेलक्या शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना टोचले आहे. Eknath Shinde should not build bashing, Environment Minister sat down with numbers; Tola of Narayan Rane !!
आजच्या पत्रकार परिषदेत दिशा सालियन प्रकरणापासून ते आपल्या बंगल्याच्या नोटीस पर्यंत अनेक प्रश्नांना नारायण यांनी उत्तरे दिली. एकनाथ शिंदे यांनी तुमच्याकडे पुरावे मागितले आहेत, असे विचारले असता नारायण राणे म्हणाले, ते पुरावे मागणारच कारण त्यांना माहिती आहे या प्रकरणात त्यांचे नाव नाही. मात्र मातोश्रीतली नावे आहेत. त्यामुळे मातोश्रीतली नावे जाहीर झाली, की तिथे बाशिंग बांधून शिवसेनेत पुढे यायला एकनाथ शिंदे तयार आहेत पण एकनाथ शिंदे यांनी फार पुढे जाऊ नये. राज्याचे पर्यावरण मंत्री नंबर लावून बसले आहेत, अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोचले.
नारायण राणे यांनी चौफेर फटकेबाजी करत दिशा सालियनवर बाहेर पोलीस प्रोटेक्शन असताना आत मध्ये बलात्कार झाला आणि तिच्या हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप केला आहे. तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाले पण त्याचा रिपोर्ट बाहेर आला नाही. सध्या त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून रिपोर्ट बाहेर येत नाहीत पण सत्ता बदलली की आज जसा वाझे बोलतो आहे असे अनेक लोक बोलायला लागतील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
Eknath Shinde should not build bashing, Environment Minister sat down with numbers; Tola of Narayan Rane !!
महत्त्वाच्या बातम्या
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू
राजस्थानात पब्जी खेळाचा आणखी एक बळी; वाढदिवसाला मोबाईल दिला नसल्याने तरुणीची आत्महत्या
शिवनेरीवर अजितदादांच्या शिवजयंतीच्या भाषणात मराठा आरक्षणावरून अडथळा; अजितदादांनी तरुणाला सुनावले…