रोहित पवारांच्या बारामती एग्रोच्या ताब्यातल्या कन्नड कारखान्याची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती एग्रोशी संबंधित संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.ED seized 161 acres of Kannada factory owned by Rohit Pawar’s Baramati Agro!!

ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती एग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लांट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.



रोहित पवारांवर आरोप काय??

कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती एग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती एग्रोची चौकशी केली. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

बारामती एग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी 5 कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती एग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती एग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रोहित पवारांची दोन वेळा चौकशी

बारमती एग्रो गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती एग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती एग्रोच्या 6 कार्यालयांवर छापेमारी करत ईडीने तपास केला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली होती.

बारामती एग्रो प्रकरणी आमदार रोहित पवार यांची या आधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. आता ईडीने कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त केली आहे.

ED seized 161 acres of Kannada factory owned by Rohit Pawar’s Baramati Agro!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात