वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहरात दिवसाढवळ्या कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 68 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.Daytime looting : Gang Of Thiefs are Arretested in Pune; Stolen goods also seized
अभिजीत उर्फ दादया अशोक रणदिवे (वय 21) , सतीश आण्णाजी केदळे (वय 32, दोघेही रा. हडपसर), आणि नोएल ऐलेन शबान (वय 20, रा. कोरेगाव पार्क ) अशी आरोपींची नावे आहेत.
हडपसर परिसरात टोळीने उच्छाद मांडला होता. कोयत्याचा धाक दाखवून दागिने चोरले होते. आरोपी हडपसरमधील म्हाडा कॉलनीत येणार असल्याची माहिती शाहिद शेख आणि शशिकांत नाळे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिजीत आणि सतीशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार नोएलच्या मदतीने बंडगार्डन, हडपसर, वानवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क ठाण्याच्या हद्दीत वाहनचालकांसह मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना लुटल्याची कबुली दिली.
आरोपींकडून 24 मोबाईल, दागिने जप्त
आरोपींकडून 24 मोबाईल, सोन्याचे दागिने, दुचाकी, टीव्ही असा मिळून 4 लाख 68 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App