CPI Maoists : महायुतीचे सरकार आले, तर महाराष्ट्रासह देशात अराजक माजवा; काठमांडू बैठकीतून माओवादी कमांडर्सची केडरला चिथावणी!!

CPI Maoists

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CPI Maoists  महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांचा पराभव झाल्यानंतर सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs विरोधात मोठा “आवाज” उठवला होता. पण तो “आवाज” नेमका कुठून आला??, याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यांनी अर्बन नक्षलवाद्यांची बैठक काठमांडू मध्ये झाली होती. त्यातूनच महाराष्ट्रासह देशात अराजक फैलावण्याचा इरादा व्यक्त झाला होता, असा आरोप केला होता. या संदर्भातला आणखी धक्कादायक खुलासा एबीपी माझाने केला. CPI Maoists

एबीपी माझाने त्यांच्या सूत्राने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने ही बातमी दिली. त्यानुसार 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान माओवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची एक मोठी बैठक काठमांडू जवळ कांतीपूर मध्ये भरली होती. याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे माओवाद्यांचे टॉप कमांडर्स हजर होते. या बैठकीत भारतातल्या राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढची रणनीती ठरविली गेली त्यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये जर भाजप केंद्रित कुठल्या युतीचे सरकार आले तर महाराष्ट्रासह देशात टप्प्याटप्प्याने कसे अराजक माजवायचे, याचा प्लॅन माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सनी भारतातून आणि महाराष्ट्रातून तिथे गेलेल्या केडरला दिला.

काठमांडूतल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून असे चार-पाच जण गेले होते, ज्यांनी संविधान बचावच्या नावाखाली महाविकास आघाडीचा उघडपणे प्रचार केला होता. त्याच बरोबर ते लिबरल विचारवंत म्हणून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. या संदर्भातली सगळी तपशीलवार माहिती फडणवीस सरकारकडे आहे.

माओवाद्यांच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बैठकीला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी, याच पार्टीची नेपाळ बांगलादेश आणि मणिपूरची स्वतंत्र शाखा यांचे कमांडर्स हजर होते. या बैठकीमध्येच माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सनी भारतात अराजक वाजवण्याचा प्लॅन या सगळ्यांना दिला. CPI Maoists

– माओवाद्यांचा प्लॅन असा :

– पहिल्या टप्प्यात सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमधून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात जोरदार प्रचार प्रसार करा.

– दुसऱ्या टप्प्यात तो प्रचार प्रसार पुढे नेऊन महाराष्ट्र हरियाणा सह येथे भाजप प्रणित सरकारी आली, त्या राज्यांमधून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढवत न्या. निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या या मागणीसाठी गावागावांमधून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे आंदोलन करा.

– तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध समाज घटकांना सरकार विरोधात रस्त्यावरच्या आंदोलनासाठी तयार करा. त्यात प्रामुख्याने मुस्लिम + दलित + ओबीसी वर्ग हा टार्गेट ठेवा.

– चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी मुस्लिम + दलित + ओबीसींचे आंदोलने उभी राहिली, की सगळीकडे अराजकाची स्थिती निर्माण झाली, असे भासवून सरकार विरोधात आरपारची लढाई पुकारा.

हे सगळे “मार्गदर्शन” माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सनी काठमांडूत झालेल्या बैठकीत तिथे हजर असलेल्या केडरला केले. त्यानुसारच मारकवाडीतल्या आंदोलनाची मोडस ऑपरेंडी दिसली. याचा पुढचा टप्पा वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनातून दिसण्याची दाट शक्यता आहे.

CPI Maoists commanders ordered to create anarchy in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात