काँग्रेस अदानींच्या विरोधात, पण पवार आजोबा + नातू अदानींच्या गाडीतून फिरतात; बाबा आढावांचा हल्लाबोल!!

Baba Adhav

विशेष प्रतिनिधी

पुणे : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या मोफत वाटपाच्या योजना यांच्या विरोधात आत्मक्लेष उपोषण सुरू केलेल्या डॉ. बाबा आढाव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अदानींच्या विरोधात आवाज उठवते पण पवार आजोबा आणि नातू अदानींच्या गाडीतून फिरतात, असा टोला बाबा आढावांनी पवार आजोबा + नातवाला हाणला. Congress Adani opposite Baba Adhav target

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये घोटाळा झालाच आहे 1952 पासून मी निवडणुका पाहतो आहे, पण या पद्धतीचा निवडणूक घोटाळा मी पाहिला नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच बाजूने मते वळवणे हा लोकशाहीला धोका आहे, असा आरोप बाबा आढाव यांनी केला. बाबा आढाव महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत


Maha Vikas Aghadi विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत वाढला तणाव!


महायुतीचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील महात्मा फुले वाढीच्या शेजारून गेले, पण ते आपल्या भेटीला आले नाहीत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार येऊन गेले. मी त्यांना काँग्रेस अदानींच्या विरोधात आहे, पण तुम्ही अदानींच्या गाडीतून फिरता, असे निदर्शनास आणून देताच त्यांनी त्या विषयावर बोलायचे टाळले, याकडे बाबा आढाव यांनी आवर्जून लक्ष वेधले. काँग्रेस जरी अदानींच्या विरोधात असली, तरी शरद पवारांनी अदानींना अनुकूल भूमिका घेतली. त्यांचे तुम्ही काय करणार??, असा सवाल बाबा आढाव यांनी महाविकास आघाडीला केला.

एरवी बाबा आढाव समाजवादी विचारसरणीचे असल्याने साधारणपणे शरद पवारांना अनुकूल भूमिका घेत असतात. परंतु, अदानी मुद्द्यावर मात्र त्यांनी काँग्रेसची बाजू घेऊन शरद पवारांच्या भूमिकेवर ठळक प्रश्नचिन्ह लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Congress Adani opposite Baba Adhav target

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात