वृत्तसंस्था
मुंबई : पुण्यातील वाढत्या रूग्णसंख्येवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली असून उद्रेक रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करायलाच हवे, आम्हाला मात्र तसे आदेश द्यायला भाग पाडू नका ,असे मुख्य न्यायमूर्तींनी बजावले आहे. complete lockdown in Pune! , High Court notice to Government; Concerns about the growing number of patients
पुण्यात कोरोनाचा कहर झाला असून एक लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत, ही बाब चिंतेची असल्याबद्दल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातल्या रुग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा याप्रकरणी स्नेहा मरजादी यांनी ऑड. अर्शिल शहा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पुण्यातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
कोरोना रोखण्यासाठी पुण्याने मुंबईचा आदर्श घ्यावा, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांनी मुंबई पालिका आयुक्तांची त्यासाठी मदत घेतली पाहिजे, असे न्यायमूर्ती यांनी सांगितले.
मुंबईत 56 हजाराच्या आसपास रुग्णसंख्या असताना पुण्यात मात्र ती दुप्पट आहे. त्यामुळे सरकार पूर्ण लॉकडाऊन का करत नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App