प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रासह संपूर्ण देश करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेत तिसऱ्या लाटेमुळे जनजीवन अस्ताव्यस्त केलेय. चीनही विळख्यात सापडलाय. केरळमध्ये रोज ३० हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे. तो सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे…CM Uddhav Thackeray appeals to every political party to cancel all political programs due to covid19 third possible wave, but sharad pawar tuned different
…पण त्यांनी महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे कालचे ट्विट वाचले आहे काय…?? वाचले नसल्याचे ते वाचा… हे ट्विट पुढीलप्रमाणे – जुन्नर म्हटले की, शिवनेरी गडाची आठवण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान होते. मात्र आजच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती कमी आहे.
जुन्नर म्हटले की शिवनेरी गडाची आठवण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान होते. मात्र आजच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती कमी आहे. माझी आयोजक व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी महिलांची उपस्थिती कशी वाढेल याची काळजी घ्यावी. — Sharad Pawar (@PawarSpeaks) September 5, 2021
जुन्नर म्हटले की शिवनेरी गडाची आठवण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान होते. मात्र आजच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती कमी आहे. माझी आयोजक व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी महिलांची उपस्थिती कशी वाढेल याची काळजी घ्यावी.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 5, 2021
माझी आयोजक व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी महिलांची उपस्थिती कशी वाढेल याची काळजी घ्यावी.शरद पवारांच्या कालच्या जुन्नर – आंबेगाव दौऱ्याच्या वेळी हे ट्विट त्यांच्या ट्विटर हँडलवरून सायंकाळी ६.३६ वाजता करण्यात आले होते.
आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्ष मंदिरे उघडण्याची आणि सण-उत्सव साजरा करण्याच्या मागणीसाठील आंदोलने करीत आहेत. परंतु, मागील अनुभव लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दीचे कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत.
इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांमध्ये राहून साजरे करावेत. आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या ट्विटर हँडलवरून काल सायंकाळी करण्यात आलेले ट्विट चर्चेत येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App