• Download App
    CM LETTER TO GOVERNOR :मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारी दुखावले । CM LETTER TO GOVERNOR: The tone in CM Thackeray's letter is threatening; Governor Koshyari hurt

    CM LETTER TO GOVERNOR :मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारी दुखावले

    • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक: महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
    • राज्यपालांनी पत्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा आणि स्वर धमकीवजा असल्याचे म्हटले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद वाढला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या पत्रावर आक्षेप घेत त्यांची भाषा धमकावणारी असल्याचे म्हटले आहे.  CM LETTER TO GOVERNOR: The tone in CM Thackeray’s letter is threatening; Governor Koshyari hurt

    पत्रातील तुमचे धमकीवजा शब्द पाहून मी दु:खी आणि निराश झालोय, असं सांगतानाच मी संविधानाचा रक्षक आहे. मला सर्व संविधानिकबाबी तपासून निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, अशी प्रखर आणि तिखट प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.  पत्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषेवर राज्यपाल कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा सूर धमकावणारा आहे. त्याच्या भाषेने मला खूप दुखावले आहे.



    काय आहे पत्रात?

    तुम्हाला विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नको त्या उद्योगात पडू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. विधानसभा अध्यक्षांबाबत होणाऱ्या निवडणुकीबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांच्या ताज्या भूमिकेनंतर सरकार विरुद्ध राज्यपाल ही लढाई आणखी वाढू शकते, असे मानले जात आहे.

    सरकारने मागितली होती परवानगी

    राज्य सरकारच्या मंत्र्यांनी रविवारी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे पत्र त्यांना दिले. चालू विधानसभा अधिवेशनात सभापतींची निवडणूक घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली होती.

    CM LETTER TO GOVERNOR : The tone in CM Thackeray’s letter is threatening; Governor Koshyari hurt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!