CM Devendra Fadnavis : राहुल गांधी देशाच्या राजकारणातील रिजेक्टेड माल; CM देवेंद्र फडणवीस म्हणाले – आम्ही त्यांना महत्त्व देत नाही

CM Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Devendra Fadnavis  महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर’ इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, त्याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ‘सीआयआय’च्या (CII) वार्षिक बैठकीतनंत माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्योगांसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात मोठी कपात होणार असल्याची माहिती दिली. तसेच, इंधन बचतीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा ‘रिजेक्टेड माल’ असा उल्लेख करत, आम्ही त्यांना महत्त्व देत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.CM Devendra Fadnavis

‘द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘सीआयआय’ बिझनेस समिटमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. “भविष्यात महाराष्ट्र कसा असेल? आणि तो आम्ही कसा घडवतो? हे मी सांगितले आहे. महाराष्ट्र आज वेगवेगळ्या क्षेत्रात लीडर आहे, हे याठिकाणी सांगितले. इंजिनिअरिंग, एफडीआय, स्टार्टअप, अशा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे. अशा महाराष्ट्राच्या स्ट्रेंथ लिबरेज करून आम्ही ट्रिलियन डॉलर इकोनॉमी कशी तयार करतोय, याची माहिती दिली,” असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.CM Devendra Fadnavis



वीज दरात मोठी कपात

उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी वीज दराबाबत महत्त्वाची माहिती दिली. “२०२५ ते २०३० या काळासाठीचे ‘मल्टी इअर टॅरिफ’ मंजूर झाले आहेत. पूर्वी दरवर्षी विजेचे दर ९ टक्क्यांनी वाढायचे. मात्र, आता नवीन धोरणानुसार उद्योगांसाठी दरवर्षी वीज दरात २ ते ३ टक्के कपात होणार आहे. घरगुती वापरासाठी येत्या पाच वर्षांत वीज दरात तब्बल २६ टक्क्यांनी कपात होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उद्योग अधिक स्पर्धात्मक होतील आणि सर्वसामान्यांच्या खिशावरील भारही कमी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis Calls Rahul Gandhi ‘Rejected’ Amid Fuel Row

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात