काँग्रेस – राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला; उद्धवना टोलवून शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर!!

प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचे मूळ नाव ‘शिवसेना’ मिळाले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे परखड निरीक्षण नोंदविले आहे.Bow and arrow mortgaged to Congress – NCP redeemed; Uddhavana tolling at Shinde Balasaheb’s memorial!!

याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार विकून काँग्रेस – राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी आज सोडवला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी हाणला. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.



आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा वारसा आहे. जे कोण आज बोलत आहेत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. बाळासाहेबांचे विचार विकण्याचे मोठे पाप केले. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते,.जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा ते दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असे म्हणतात. ही दुटप्पी भूमिका ते घेत आहेत, त्यांना त्यांची जागा निकालाने दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी यापूर्वीच धनुष्यबाण गोठवले जाईल असे म्हटले होते. परंतु २०१९ ला काँग्रेस – राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता, तो मी आता सोडवला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Bow and arrow mortgaged to Congress – NCP redeemed; Uddhavana tolling at Shinde Balasaheb’s memorial!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात