सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ”महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत.”, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज म्हणाले आहेत. ज्यावर भाजपाने जोरदार पलटवार केला आहे. BJP responded to Sanjay Rauts criticism of the state government
भाजपाने म्हटले आहे की, ”राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही, हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे.. पण आज तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले. कधी तुमच्या मालकाला विचारा. त्यांना बीडचा सुमंत रुईकर आठवतो का? तो आठवा!! म्हणजे तुमचे आजचे वाक्य तुमच्याच कानफटात कसे वाजते त्याचा आवाज आठवा. सुमंत आठवला की त्याचा अकाली मृत्यू आठवा, त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही वाऱ्यावर सोडलेले त्याचे कुटुंब आठवा…त्यांची पत्नी कीर्ती काय म्हणाली तेही आठवा. सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा.”
याशिवाय ”तुमचे मालक उद्धव ठाकरे यांची मणक्याची शस्त्रक्रिया नीट होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, मी बीड ते तिरूपती पायी चालत दर्शनाला येईन असे साकडे बालाजीला सुमंत रुईकरने घातले होते. उध्दव ठाकरे ठणठणीत झाल्यावर आपले वचन पूर्ण करण्यासाठी बीडहून 1100 किमी पायी निघालेल्या सुमंतचा कर्नाटकात मृत्यू झाला आणि त्यानंतर तुम्ही आणि तुमचे मालक सुमंतला विसरले. त्यांची पत्नी कीर्ती म्हणाली, ज्या ठाकरेंच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी तिच्या नवऱ्याने जीव दिला. त्याच्या मृत्युनंतर दहा दिवसांत ठाकरे कुटुंबातील कोणीही सुमंतच्या परिवाराशी संपर्क केला नाही. त्यानंतरही दीड वर्षे ठाकरे कुटुंबातील कुणीच बोलले नाही, भेटले नाहीत. साधी विचारपूसही केली नाही.. माझ्या नवऱ्याचे बलिदान व्यर्थ गेले..!!!” याचीही भाजपाने आठवण करून दिली आहे.
याचबरोबर ” लक्षात आले का राऊत रेडा कोण घेवून फिरते? पक्ष नावाचे कुटुंब वाऱ्यावर सोडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी…’ इतकेच तुम्हांला आणि तुमच्या मालकाला ठावूक आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांचे कर्तुत्व तुम्ही विरसलेच आहात. या पंधरवड्यात त्यांचे स्मरण करा. कशाला यमाचे नाव काढता?” असं म्हणत भाजपाने संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
BJP responded to Sanjay Rauts criticism of the state government
महत्वाच्या बातम्या
- कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!
- Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!
- विनायक ग्रुप आणि महाराष्ट्र सपा अध्यक्ष अबू आझमी यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापा
- भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!