विशेष प्रतिनिधी
पुणे : झी मराठी वाहिनीवरील सगळ्यात लोकप्रिय ठरलेली छत्रपती संभाजी महाराज या यांच्या जीवन चरित्रावर आधारित असणाऱ्या ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी ‘सिंगल’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे. Actress Prajakta Gaikwad new roll
आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्राजक्ता सांगते, ‘कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. मी आजवर कॉलेजगोईंग भूमिका साकारली नव्हती. अतिशय साधीसरळ मुलगी मी यात साकारली असून, ‘सिंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या जॉनरची भूमिका करायला मिळाल्याचा आनंद आहे. प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे या सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं असून या चित्रपटात आम्ही ‘फुल ऑन कल्ला’ केला आहे. मी चित्रपटात ‘सिंगल’ राहणार की ‘मिंगल’ हे बघणं प्रेक्षकांसाठी धमाल अनुभव असणार आहे.
किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक हे ‘सिंगल’ या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.
Actress Prajakta Gaikwad new roll
महत्वाच्या बातम्या
- NDA सोडल्याच्या अफवांवर पवन कल्याण यांचा खुलासा, म्हणाले- मी पूर्णपणे भाजपसोबतच!
- तहव्वूर राणाचे भारतातील प्रत्यार्पण आणखी काही काळ पुढे ढकलले, अमेरिकन कोर्टाने याचिका दाखल करण्यासाठी दिला वेळ
- वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला धक्का, शुभमन गिलची प्रकृती खालावली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे कठीण
- मुंबईत 6 मजली इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू; 46 जण होरपळले, दोघांची प्रकृती चिंताजनक