Navnath Ban : संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली आहे का? उबाठा गट ताब्यात घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न

 Navnath Ban

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  Navnath Ban मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती आहे. दिनु मोर्या कुणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटले याची संपूर्ण माहिती सर्वांना आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. Navnath Ban

नवनाथ बन म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जोराचे भांडण सुरू आहे. रोज उठायचे मिठी नदीचे नाव घेत त्यामधील भ्रष्ट्राचार बाहेर आला पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहे. ते समोर आले की आदित्य ठाकरे आणि कंपनीचा भ्रष्टाचार पुढे येणार आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राऊत रोज त्यावर बोलत आहेत. Navnath Ban



आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी सुपारी घेतली आहे की येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांना संपवायचे आणि उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, म्हणून मिठी नदीचे नाव वारंवार त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंना या प्रकरणी अडचणीत आणण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. या नदीचा गाळ खाणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अदानी-अंबानींच्या लग्नात जाऊन कुणी डान्स केला होता. कोणी हात जोडले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे.

घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही

नवनाथ बन म्हणाले की, सरकार अफवा पसरवण्याचे काम करत नाही तर माहिती देण्याचे काम करते. राऊतांकडून रोज सकाळी अफवा पसरवण्याचे काम होते. आज शहरामध्ये बुकींग करताच 25 दिवसांमध्ये सिलिंडर मिळते. साठेबाजीमुळे काही ठिकाणी तुटवडा आहे, पण घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही.गॅसचा पाईप असेल तर सिलिंडर का हवे आहे.लोकांना सिलिंडर मिळू नये म्हणून त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहे.

40 देशांतून कच्च्या तेलाची आयात

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 140 कोटी भारतीयांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात रोज बैठका होत असून आपन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. इराणकडून सुरक्षितपणे पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर 40 देशांकडून कच्चे तेल आपण आयात करत आहोत.आपल्याकडे कुठेही पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागलेल्या नाहीत. फक्त काही ठिकाणी गॅसचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण त्याचा फटका जनतेला बसू नये याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे. राऊतांसारखे घरात बसणारे हे सरकार नाही.

 Navnath Ban  Did Sanjay Raut Take a ‘Supari’ to Finish Aditya Thackeray? BJP’s Big Claim VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात