• Download App
    'शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडलाच उचललाय!', गोपीचंद पडळकरांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका । BJP MLA Gopichand Padalkar Criticizes Shiv Sena MP Sanjay Raut On His Saamana Column on Priyanka Gandhi

    ‘शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडाच उचललाय!’, गोपीचंद पडळकरांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये संजय राऊत यांच्या रोखठोक या सदरातील प्रियांका गांधी यांच्या लेखावर त्यांनी सडकून टीका केली आहे. पडळकर यांनी ट्वीट करून राऊतांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडाच उचलल्याची टीका त्यांनी राऊतांवर केली आहे. BJP MLA Gopichand Padalkar Criticizes Shiv Sena MP Sanjay Raut On His Saamana Column on Priyanka Gandhi


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये संजय राऊत यांच्या रोखठोक या सदरातील प्रियांका गांधी यांच्या लेखावर त्यांनी सडकून टीका केली आहे. पडळकर यांनी ट्वीट करून राऊतांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडाच उचलल्याची टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘एका अंधाऱ्या रात्री! प्रियांका गांधींची लढाई’ या शीर्षकाने लेख लिहिला आहे. यात राऊतांनी लिहिले की, “उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले, मंत्रिपुत्र अजूनही मोकाट आहे. चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्यांची झोप उडवण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसले.”

    या लेखावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “जनाब #संजय राऊत यांनी #सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण #कॉंग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय.!” यानंतर आता शिवसेनेकडून पडळकरांना कशाप्रकारे प्रत्युत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत राऊतांनी नुकतीच माहिती दिली आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, लखीमपूर हिंसाचाराच्या विरोधात 11 ऑक्टोबर रोजीच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेनाही पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संजय राऊत यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

    BJP MLA Gopichand Padalkar Criticizes Shiv Sena MP Sanjay Raut On His Saamana Column on Priyanka Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता