प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय नसलेल्या पक्षाचे घराणेशाहीतूनच अध्यक्ष!! अशा शेलक्या शब्दांमध्ये शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर भाजप नेत्यांनी टोले हाणले आहेत. शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यामुळे उद्धव ठाकरे, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसेल. त्यांना आपल्या राजकारणाची फेररचना करावी लागेल, असा दावा करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या आहेत.BJP leaders targets sharad Pawar over his retirement and installation of new president
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या दिशेने शेलके वाग्बाण सोडले आहेत. मूळात जो पक्ष राष्ट्रीयच उरलेला नाही, त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल??, हे त्यांचे नेते ठरवत आहेत, अशा शब्दांमध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला आहे.
निवडणूक परफॉर्मन्सच्या आधारे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांचा हा टोला आहे, तर शरद पवारांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू झाल्यानंतर ते “पवार” आहेत. स्वतःच्या घराण्याबाहेरचा अध्यक्ष याचा ते विचारही करू शकत नाहीत आणि ते दुसऱ्या कोणालाही अध्यक्ष पदावर बसवणार नाहीत, असा टोला राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App