सामान्य माणसांकडे पैसा नसला तरी कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाला संधी मिळावी, यासाठीच विरोधी पक्षांच्या स्थानिक नेत्यांना शॉक देण्याची गरज आहे.Big offer by Chandrakant Patil; Said – Defeat the NCP state president and get the crown of gold
विशेष प्रतिनिधी
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी सांगली महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेत सत्तांतर घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजकीय धक्के दिले आहेत. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं दिसत आहे.
शुक्रवारी दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला असे वाटत होते की, राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही, पण यापूर्वीच भाजपने त्यांना धक्के दिले आहेत.
आता आगामी निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे. हा मुकुट कोण मिळवणार ते पाहूया. अस म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना झोमात तयारीला लावल्याचे दिसत आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात शरद पवार हे भाजपसाठी आव्हान नाहीत. ५६च्या वर त्यांचे कधीही आमदार निवडून आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसाठी आव्हान ठरू शकत नाही, ‘देशात नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सामान्य माणूस राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आला आहे.
सामान्य माणसांकडे पैसा नसला तरी कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाला संधी मिळावी, यासाठीच विरोधी पक्षांच्या स्थानिक नेत्यांना शॉक देण्याची गरज आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात २७ ओबीसी मंत्री आहेत. इंदिरा गांधींनाही ते शक्य झाले नव्हते’, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App