वृत्तसंस्था
मुंबई : आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत उरकून घ्या. कारण परवा २६ मार्चपासून सलग ४ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. Banks in the state will remain closed for four days in a row; Two days of vacation, two days of workers’ strike
यामुळं सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ मार्च रोजी बॅंक कर्मचारी संघटनांचा संप आहे आणि २६ आणि २७ मार्च रोजी बॅंकांना सुट्टी असल्यानं सलग चार दिवस बँक बंद राहणार आहेत. ऐन मार्च महिन्यात संप होत असल्यानं सामान्य ग्राहकांसोबतच बॅंकिंग क्षेत्राला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळं स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बँका बंद राहणार आहेत. संपात पाच लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App