विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा मनसुबा उधळला जात असल्याचे पाहून महाविकास आघाडी सरकार खवळले आहे. या संतापातून महाविकास आघाडीच्या आमदारांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ले चढविले आहेत. Assembly Speaker election suspended; But the repercussions in the House are meow-meow and hoop-hoop !!
नितेश राणे यांनी परवा विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांना बघून म्याऊं – म्याऊंचा आवाज काढला होता. त्यावर दोन दिवस फारसे काही घडले नाही. परंतु आज शिवसेनेचे सदस्य सुहास कांदे यांनी विधानसभा सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून आदित्य ठाकरे यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करून घेतली. आदित्य ठाकरे हे आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. भाजपला जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरणीय आहेत, तेवढेच आदरणीय आमच्यासाठी आदित्य ठाकरे साहेब आहेत, असे ते म्हणाले.
त्यावर शिवसेनेचे दुसरे नेते भास्कर जाधव यांनी देखील नितेश राणे आपल्याला बिस्किट खाऊ घातल्यानंतर चावणारा कुत्रा असे म्हणाल्याचे सांगितले. या मुद्यावरून विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमकपणे लावून धरली.
त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव हे पूर्वी छगन भुजबळ यांच्याकडे बघून हुप – हुप करायचे, याची आठवण करून दिली. त्यावेळीच सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी निलेश नितेश राणे यांच्या निलंबनाचे विचार मनात ठरवूनच आरोप चालवले आहेत, असे ते म्हणाले. विधानसभेत भाजपचे 12 आमदार निलंबित केले. आता तेरावा आमदार निलंबित करायचा आहे. परंतु लोकशाहीसाठी हा पायंडा चांगला नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला सरकारे येत असतात जात असतात पण हा पायंडा तुमच्या साठी देखील घातक ठरेल, असे फडणवीस महाविकास आघाडीला उद्देशून म्हणाले.
एकूण विधिमंडळात अध्यक्ष विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होत नाही. त्यावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर राजकारण सुरू असताना म्याऊं – म्याऊं आणि हुप – हुपचे पडसाद सदनात उमटले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App