वृत्तसंस्था
मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरण तुरुंगात असलेले ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गुरूवारी परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना छातीत आणि खांद्याला दुखत असल्याची तक्रार त्यांनी केल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती केईएमच्या रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. Anil Deshmukh admitted in ICU of KEM Hospital on complaint of chest pain !!
अनिल देशमुखांना उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना ऍडमिट केले आहे. तपासाअंती त्यांना रक्तदाब वाढल्याचे आढळून आले. शिवाय हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यासाठी त्यांना आज शुक्रवारी एक दिवस रुग्णालयात ठेवून घेतल्याची माहिती रुग्णालयाने दिली. उद्या, शनिवारी अनिल देशमुख यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App