विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय सहकारमंत्रीपदी अमित शहा यांची नियुक्ती झाल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नव्या मालकाबाबत चिंतेत पडले आहेत, अशी टीका उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाण्डेय यांनी केली. Amit Shah as Co-operation Minister; Sanjay Raut fell into anxiety : sanjay Pandeya Accused
ज्या संजय राऊतांना स्वतः च्या शिवसेनेचा सहयोग नाही. ज्यांची फक्त माध्यमांबरोबर सहयोग अशी ओळख .अशा संजय राऊतांनी सहकारबद्दल बोलावं यापेक्षा विनोदाची गोष्टच होऊ शकत नाही. जेव्हापासून माननीय अमितभाई शाह हे केंद्रीय सहकार मंत्री झाले तेव्हापासून राऊत साहेब आपल्या नवीन मालकांसाठी फार चिंतित दिसत आहेत. राऊत साहेब चिंता चिते समान असते. कृपा करून काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App