लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधात सकल हिंदू एकवटले; पिंपरी-चिंचवड मध्ये विराट मोर्चा

प्रतिनिधी

पिंपरी : लव्ह जिहाद विरोधी, गोहत्या, धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येसारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी चिंचवड येथे विविध हिंदू संघटनानी रविवारी विराट मोर्चा काढला. All Hindus united against love jihad, cow slaughter, conversion

मोर्चाद्वारे विविध मागण्यांना वाचा फोडत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाजाच्यावतीने लहुजी वस्ताद, साळवे स्मारक चिंचवड येथून रविवारी सकाळी दहा वाजता या विराट मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह निगडी, चिखली प्राधिकरण, देहू , आळंदी नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र, हिंजवडी, गहूंजे येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था, हिंदुत्व वादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. लव जिहाद, गोहत्या धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या विराट मोर्चाद्वारे करण्यात आल्या.



लहुजी वस्ताद,साळवे स्मारक चिंचवड येथून निघालेला विराट मोर्चा पिंपरी चिंचवड मुख्य मार्गाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पोहचला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी प्रशासनाला निवेदन दिले. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत होता, दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चा क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महापुरुषांच्या पुतळ्याला, स्मारकाला अभिवादन करून मोर्चा पुढे सरकत होता. समारोप स्थानी पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आले व्यासपीठावर छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावाला याला क्षणभरही जगण्याचा अधिकार नाही. या नराधमाला मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाकर्‍यांनी यावेळी केली समारोप स्थानी विविध संस्था, संघटना प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त करून लवकरात लवकर याविरोधात कायदे करण्याची मागणी केली.

देशभरात वाढू पाहणाऱ्या लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोवंश हत्या, बेकायदेशीर धर्मांतरण, महापुरुषांचा अवमान आदी विकृतींविरोधात रविवारी हिंदू धर्मातील विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन विराट जन गर्जना मोर्चा काढत एकीची वज्रमूठ भक्कम केली.

All Hindus united against love jihad, cow slaughter, conversion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात