वृत्तसंस्था
नागपूर : राज्यातील जनता महाविकास आघाडी शासनाला कंटाळली असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भाजपची एकहाती सत्ता आणू, असा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी केला. After Goa, power will be brought to Maharashtra unilaterally; Claim of Nitin Gadkari and Devendra Fadnavis
गोवा विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपतर्फे तेथील निवडणूक प्रभारी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विजय रॅली काढण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला सामान्य जनता कंटाळली आहे. राज्यात महावसुली आघाडीचे सरकार आहे. आता लढाई शिगेला पोहोचली आहे. सरकारने आमच्याविरोधात कितीही केसेस केल्या तरी मंत्र्यांचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणूच. येणाऱ्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या निवडणुका एकहाती जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App