आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे आणि लँडस्लाइड्समुळे आंबा घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मागील दोन आठवड्यांपासून हा घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. आता कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या अधिकार्यांनी या गोष्टीवर चर्चा करून यातून मार्ग काढला आहे.

aamba Ghat will be reopened for heavy vehicles

लवकरच हा मार्ग सुरू होणार आहे.. तात्पुरती डागडुजी करून हलक्या वाहनांसाठी हा मार्ग काही काळापुरता चालू होता. पण आता आंबाघाट तसेच कोल्हापूर- रत्नागिरी हायवे लवकरच जड वाहनांसाठी सुरू केले जाणार आहेत. व्यापार वाहतुकीच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मार्ग आहे.


सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळ्यात आंदोलनाचा जोर; सेवा समाप्ती कारवाईचा एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा!


आंबा घाटामध्ये दुरूस्तीचे काम चालू होते. त्यामुळे अणुस्कुरा घाटमधून तात्पुरती वाहतूक चालू होती. पण या मार्गे वाहतूक करणे लांबपल्ल्याचे आहे. त्यामध्ये वाढत्या डिझेलच्या किमती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आंबाघाट व्यापार वाहतुकीसाठी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातील खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की आंबाघाट सहा चाकी वाहनांसाठी टेम्पो ट्रकसाठी पुढील दोन आठवड्यांमध्ये सुरू करण्यात येईल.

aamba Ghat will be reopened for heavy vehicles

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात