पथकामध्ये चार ते पाच पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते सायबर सेलचे विशेष प्रशिक्षित अधिकारी आहेत.A special team will come to investigate the attack on Rohini Khadse
विशेष प्रतिनिधी
जळगाव : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान सूतगिरणी ते कोथळी या दरम्यानच्या रस्त्यावर हल्ला झाला होता.
दरम्यान या हल्ल्याच्या चौकशीसाठी नाशिक आयुक्त यांच्याकडून विशेष तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून हे पथक मुक्ताईनगर येथे आहे.पथकामध्ये चार ते पाच पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते सायबर सेलचे विशेष प्रशिक्षित अधिकारी आहेत.
ॲड रोहिणी खडसे यांच्या हल्ल्याबाबत त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली होती.त्यावरुन शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान या प्रकरणाची तळापासून चौकशी व्हावी, म्हणून पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App