तुमचे हात युद्धाच्या रक्ताने माखलेत!!, तुम्ही अध्यक्ष व्हायला नालायक आहात; अमेरिकन लढाऊ वैमानिकाने जो बायडेनना सुनावले


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : मिस्टर प्रेसिडेंट, तुमचे हात युद्धाच्या रक्ताने माखलेत. तुम्ही अध्यक्ष व्हायला नालायक आहात, अमेरिकन लढाऊ वैमानिकाने जो बायडेन यांना कठोर शब्दात सुनावले आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधित युद्ध-वैमानिक अमेरिकन अध्यक्षांना कठोर शब्दात ताडत आहे, असे दिसते आहे. We fought in your damned wars. You sent us to harm civilians. Sir, you have blood on your hands.

तुम्ही अफगाणिस्तान आणि इराक मध्ये आम्हाला युद्ध करायला पाठवले. हजारो निरपराध नागरिकांचे बळी घेतले. माझे भाऊबंद त्यात मेले. या सगळ्या रक्तरंजित युद्धाला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही अध्यक्ष व्हायला नालायक आहात, अशा कठोर शब्दांमध्ये संबंधित युद्ध वैमानिकाने जो बायडेन यांना सुनावले आहे.

त्यावेळी जो बायडेन अक्षरशः निशब्द झाले आणि तिथून बाजूला झाले. पण तरीदेखील हा युद्ध वैमानिक कठोर शब्दात त्यांना ताडतच राहिला.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अमेरिकन अध्यक्षांची युद्धखोरी या निमित्ताने त्यांच्याच वैमानिकाने जाहीर केली. त्यांचे वाभाडे काढले हे बरे झाले. अमेरिका इतर देशांना लोकशाही – बंधुत्व वगैरे शिकवत असते. पण त्याच देशाचे अध्यक्ष इतर देशांना युद्धात लोटतात, हे त्या देशाच्या सैनिकाने जाहीररीत्या सांगितले यावर अनेकांनी समाधानही व्यक्त केले आहे.

https://youtu.be/FizIaKuvYJo

  •  मिस्टर प्रेसिडेंट, तुमचे हात युद्धाच्या रक्ताने माखलेत
  •  अमेरिकन लढाऊ वैमानिकाने जो बायडन यांना सुनावले
  •  इराक अफगाणिस्तानात युद्ध लढायला तुम्ही पाठवलेत
  •  शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेतलेत. माझे भाऊ त्यात मेलेत
  •  तुमचे हात स्वकीयांच्या रक्ताने माखलेत
  •  तुम्ही अमेरिकेच्या अध्यक्षपदी राहायला नालायक आहात

We fought in your damned wars. You sent us to harm civilians. Sir, you have blood on your hands.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात