प्रतिनिधी
जलालाबाद – अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नानगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करीत शनिवारी तीन बाँबस्फोट झाले. यात तीन जण ठार झाले तर २० जण जखमी झाले.Three killed in Bomb blast in Afghanistan
स्फोटाची जबाबदारी कोणी घेतली नसली तरी या भागात इसिसकडून हिंसाचार वाढत आहे आणि देशातील नव्या अफगाण सत्ताधाऱ्यांचे त्यांच्याशी शत्रूत्व असल्याने ‘इसिस’बद्दल शंका व्यक्त होत आहे. काबूलमध्येही आज चिकट पदार्थाचे आवरण असलेल्या बाँबचा स्फोट झाला. त्यात सातजण जखमी झाले.
हा स्फोटदेखील तालिबानच्या नव्या राजवटीला दिलेला इशारा मानला जातो. तालिबान सत्तेत आल्यापासून देशातील शांतता व कायदा सुव्यवस्था पुरती कोलमडली असून त्यात आता या स्फोटांची भर पडली आहे. त्यामुळे यावर तालिबान आता खसी प्रतिक्रिया देतो यावर बरेच काही अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App