दहशतवादी साजिद मीरची ऑडिओक्लिप ऐकवत, भारताने ‘यूएन’मध्ये चीन आणि पाकिस्तानला दाखवला आरसा!

अमेरिकेने साजिद मीरच्या डोक्यावर ५० लाख डॉलर्सचे इनाम ठेवले आहे.

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रस्ताव आणला, ज्याला चीनने रोखले. यावर भारताने बुधवारी प्रतिक्रिया दिली. चीनच्या या कृतीचा भारताने संयुक्त राष्ट्रात निषेध केला. त्याचवेळी भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही आरसा दाखवला. दहशतवादी साजिद मीरची ऑडिओ क्लिप भारताने ऐकवली.  Playing  to the audio clip of terrorist Sajid Mir India showed a mirror to China and Pakistan in the UN

भारताने संयुक्त राष्ट्रात कथन केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये दहशतवादी साजिद मीर आपल्या दुसऱ्या दहशतवाद्याला गोळीबार करणयास सांगत असल्याचे ऐकू येते. दहशतवादी साजिद मीरचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समोरून दुसरा दहशतवादी म्हणतो की, ‘’इन्शाअल्लाह….’’

दहशतवादी साजिद मीरवर ५ मिलियन डॉलरचे बक्षीस  –

दहशतवादी साजिद मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. मुंबई हल्ल्यातील भूमिकेबद्दल अमेरिकेने मीरच्या डोक्यावर ५० लाख डॉलर्सचे इनाम ठेवले आहे. यावर्षी जूनमध्ये, पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला दहशतवादी फंडिंग प्रकरणात १५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Playing  to the audio clip of terrorist Sajid Mir India showed a mirror to China and Pakistan in the UN

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात