Formula 1 boss lady murdered : मोटरस्पोर्ट्स जगतावर शोककळा पसरली आहे. बेल्जियममधील स्पा-फ्रॅन्कोरचॅम्प्स ट्रॅकच्या माजी कार रेस ड्रायव्हर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नॅथली मेलेट यांच्या निधनावर दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. Formula 1 boss lady murdered by husband after found with lover in bedroom
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मोटरस्पोर्ट्स जगतावर शोककळा पसरली आहे. बेल्जियममधील स्पा-फ्रॅन्कोरचॅम्प्स ट्रॅकच्या माजी कार रेस ड्रायव्हर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नॅथली मेलेट यांच्या निधनावर दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
एफ -1 ने मिलेट यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. F1ने ट्वीट केले की, “आमच्या भागीदार नथाली मेलेट यांच्या निधनाने दुःख झाले आहे. संपूर्ण फॉर्म्युला 1 त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. मोटरस्पोर्टच्या जगाने एक महान व्यक्ती गमावली. आम्हाला त्यांची कायम आठवण येईल.”
We are deeply saddened by the awful news that our friend Nathalie Maillet has died. The whole of Formula 1 sends its deepest condolences to her family and friends. The motorsport community has lost an incredible person and we will all miss her greatly. — F1 Media (@F1Media) August 15, 2021
We are deeply saddened by the awful news that our friend Nathalie Maillet has died. The whole of Formula 1 sends its deepest condolences to her family and friends. The motorsport community has lost an incredible person and we will all miss her greatly.
— F1 Media (@F1Media) August 15, 2021
बेल्जियमच्या मीडिया रिपोर्टनुसार, मेलेट आणि अन्य एका महिलेचा रविवारी गौव प्रदेशात त्यांचे पती फ्रांझ डुबोईस यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तसेच पतीने नंतर स्वतःवर गोळी झाडली. मिलेट 61 वर्षांच्या होत्या. बेल्जियममधील फॉर्म्युला वन सर्किटच्या त्या संचालिका होत्या. पोलिसांनी नंतर एका निवेदनात म्हटले आहे की, दोन महिला आणि एका पुरुषाचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या शरीरावर गोळीबाराच्या खुणाही आढळल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ‘पतीने जाणूनबुजून दोन महिलांविरुद्ध शस्त्राचा वापर केला. त्यापैकी एक त्यांची पत्नी होती. दोघींची हत्या केल्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडली.
फॉक्स स्पोर्ट्सनुसार, या हत्येमागे पतीच्या नाराजीची बाब समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, पतीने दोन्ही महिलांना अंतरंग अवस्थेत पाहिले होते. यानंतर त्याने रागाच्या भरात हे पाऊल उचलले. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
वयाच्या 33 व्या वर्षी मिलेटने मोटार रेसिंगच्या जगात प्रवेश केला. यानंतर तिने 2006 मध्ये पहिला फन कप जिंकला. त्याच वर्षी ती रोडस्टर कपमध्ये उपविजेतीही होती. मेलेट 2016 मध्ये स्पा-फ्रँकोरचॅम्प्सची प्रमुख बनली. सर्किटने 1925 मध्ये पहिले ग्रां प्री आयोजित केले. 1985 पासून दरवर्षी याचे आयोजन केले जाते. मिलेटने सर्किटच्या आगमनानंतर त्याचे अपग्रेड करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Formula 1 boss lady murdered by husband after found with lover in bedroom
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App