विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर ड्रोनमधून हेरगिरी होत असल्याचे उघड झाले आहे.भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या घरांवर पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. इस्लामाबादमधील हा परिसर अतिशय सुरक्षित समजला जातो. या परिसरात ही घटना समोर आल्याने भारतीय अधिकाºयांनी चिंता व्यक्त केली.Drone spying on Indian embassy in Pakistan
ही घटना २६ जून रोजी घडली. ड्रोन दिसला तेव्हा भारतीय दूतावास आणि निवास स्थानाच्या आवारात एक कार्यक्रम सुरू होता. हा ड्रोन कुठून आला, याबाबतची माहिती समोर आली नाही. ड्रोनमुळे भारतीय दूतावासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या तळावर २६ जून रोजीच ड्रोनने स्फोटके डागण्यात आली. भारतीय हवाई दलाने २७ जून रोजी याची माहिती दिली होती. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे. जम्मूतील हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्यासाठी मिलिट्री ग्रेडच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.
भारतीय दूतावासाने याप्रकरणी पाकिस्तान सरकारकडे आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यापूर्वीही भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांवर हेरगिरी करण्याचे प्रकार घडले होते. अनेक वेळ हनीट्रॅप लावण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतीय अधिकारी या आमिषाला बळी पडले नव्हते. त्यामुळे आता ड्रोनद्वारे टेहळणी केली जात आहे. ड्रोनमध्ये छुपे कॅमेरे लावल्याचेही बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App