बँकिंग संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनची अजब सुरक्षा; बँकाबाहेर रणगाडे!!


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनमध्ये सध्या मोठे बॅंकिंग संकट उभे राहिले आहे. या संकटामुळे अनेक चिनी बॅंकांनी ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे हजारो नागरिक रस्त्यांवर निदर्शने करण्यासाठी उतरले आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यामुळे आता बॅंकाच्या आजूबाजूला रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. China’s strange security to emerge from the banking crisis

1989 च्या तिन आन मेन स्क्वेअर घटनेची आठवण करून देणारी ही घटना आहे. आंदोलकांना चिरडण्याचा चिनी कम्युनिस्ट सरकारचा हिंसक चेहरा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे.

बॅंकेतून पैसै काढण्यावर निर्बंध 

एप्रिल 2022 मध्ये चिनी बॅंकामध्ये झालेल्या घोटाळ्यासंबंधित माहिती देण्यात आली होती. त्यात 40 अब्ज युआन म्हणजेच 6 अब्ज डाॅलर्स चीनच्या बॅंकींग व्यवस्थेतून गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर हेनान आणि अनहुई प्रांतातील बॅंकांनी ग्राहकांना बॅंकेतून पैसे काढण्यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. त्यासाठी सिस्टिम अपग्रेडचे कारण देण्यात आले होते.

China’s strange security to emerge from the banking crisis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात