अमेरिका एवढी powerfull उरलेली नाही, पण इजराइलने चालवण्याइतपत ती दुबळी झालीय का??

Rick Sanchez

अमेरिका आता एवढी powerfull उरलेली नाही, पण इजराइलने चालवण्या इतपत ती दुबळी झालीय का??, असा सवाल विचारायची वेळ एका अमेरिकन पत्रकार आणि विश्लेषकाच्या वक्तव्यामुळे समोर आली. Rick Sanchez

रिक सांचेझ असे या पत्रकाराचे नाव. रिक सांचेझ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना एक धाडसी वक्तव्य केले डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण स्थिर नाही. अमेरिका आता एवढा शक्तिशाली देश उरलेला नाही. कुठलाही बाजार अस्थिर करू नये एवढे व्यापाऱ्याला कळते. पण ट्रम्प यांना ते सुद्धा कळत नाही म्हणून ते आज एकदम वातावरण तापवणारे वक्तव्य करतात. दुसऱ्या दिवशी वातावरण थंडावणारे वक्तव्य करतात. ते स्वतः अस्थिर आहेत. त्यामुळे ते देशालाही अस्थिर करतात. अमेरिका आता शक्तिशाली देश उरलेला नाही इजरायल हा जगातला शक्तिशाली देश आहे. तो अमेरिका चालवतो इजराइल जेव्हा सांगतो तेव्हा अमेरिका जगावर भुंकते, अशा शब्दांमध्ये रिक सांचेझ यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या धोरणांचे वाभाडे काढले.

अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य म्हणून एक सांचेझ यांचे वक्तव्य ठीकच आहे, पण म्हणून ते वास्तवाला धरून आहे का??, याचा विचार खरं म्हणजे केला पाहिजे आणि तो करताना सांचेझ यांचे वक्तव्य पूर्ण सत्य नसून ते अर्धसत्य असू शकते, असे म्हणायची वेळ घेऊन ठेवू शकते.

– इजराइलचे अस्तित्व अमेरिकेवर अवलंबून

अमेरिका आणि इजराइल यांचे संबंध इजराइलच्या स्थापनेपासूनचे आहेत. किंबहुना इजराइलच्या स्थापनेसाठी अमेरिका हाच एकमेव देश जबाबदार आहे. अन्यथा अरब शत्रू राष्ट्रांनी घेरलेल्या परिसरात इजराइल नावाचा तो देश टिकलाच नसता. पण अमेरिकेच्या भरभक्कम पाठिंब्यावर आणि तिच्या शस्त्रबळाच्या पाठिंबावर इजराइल नावाचा जो देश अरब देशांच्या मध्यभागी अस्तित्वात येऊन टिकू शकला. त्यामुळे अमेरिकेपेक्षा इजरायल शक्तिशाली आहे असे मानणे वास्तवाला धरून होणार नाही.



– अमेरिकेत ज्यू लॉबी शक्तिशाली

पण एक सत्य त्या पलीकडचे देखील आहे आणि ते जास्त वास्तववादी आहे ते म्हणजे, अमेरिकेतली इजराइल लॉबी म्हणजेच ज्यू लॉबी प्रचंड शक्तिशाली आहे. अमेरिकन प्रशासनापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अमेरिकेला अग्रेसर करण्यात ज्यू लॉबीचा प्रचंड हात आहे. किंबहुना ज्यू लॉबी शक्तिशाली नसती, तर अमेरिका आज एवढी शक्तिशाली देशच बनू शकली नसती, अशी अवस्था निश्चित आहे. पहिल्या महायुद्धाच्या म्हणजेच गेल्या शतकाच्या आरंभापासून ते 2025 पर्यंत म्हणजे साधारण 125 वर्षे अमेरिकेत ज्यू लॉबी दिवसेंदिवस शक्तिशाली होत गेली आणि तिने आपले अशा पद्धतीचे वर्चस्व निर्माण केले की ज्यू लॉबी अमेरिका चालवते, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरू शकणार नाही. त्या अर्थाने अमेरिकेची शक्ती ज्यू लॉबीच्या शक्तिशाली अस्तित्वात आहे, हे मान्य करावे लागेल.

पण याचा अर्थ इजराइलच अमेरिका चालविण्याएवढी अमेरिका दुबळी झाली आहे असाही त्याचा अर्थ होत नाही. कारण अमेरिकेने ट्रम्प प्रशासनाच्या नेतृत्वाखाली भारताच्या विरोधात विशिष्ट भूमिका घेतली असली, तरी ती अमेरिकेतल्या ज्यू लॉबीला मान्य असण्याची शक्यता नाही. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या बरोबरीने किंवा अमेरिकेच्या आसपास इजराइलला भारत हा सगळ्यात जवळचा मित्र आहे, हे वास्तव देखील विसरून जाणार नाही.

United States is not the most powerful country in the world” Says American journalist Rick Sanchez

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात