वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि भावी इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटला पुन्हा सुरू करायला ट्विटरने मान्यता दिली आहे. पण आता खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर येणे नकोसे झाले आहे. Twitter Approval of Donald Trump Account; But now Trump doesn’t like Twitter
ट्विटरची मालकी बदलून ती एलन मस्क यांच्याकडे आल्यानंतर तेव्हाच डोनाल्ड ट्रम्प ट्विटर वर परत येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. एलन मस्क यांनी त्यासंदर्भात स्वतःच्या अकाउंटवर ट्विटर पोल घेतला. जनतेला ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा बहाल करावे का?, असा प्रश्न विचारला. त्यावर 52 % लोकांनी अनुकूल प्रतिसाद दिला. त्यामुळे एलन मस्क यांनी ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा बहाल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा बहाल झाले.
Reinstate former President Trump — Elon Musk (@elonmusk) November 19, 2022
Reinstate former President Trump
— Elon Musk (@elonmusk) November 19, 2022
परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर बंदी आल्यानंतर स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “सोशल ट्रूथ” असा आधीच सुरू केला आहे. त्यावर त्यांचे 45 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांनाच ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू झाल्याचे अप्रूप उरलेले नाही. त्यामुळे त्यांना स्वतःलाच परत ट्विटरवर येण्यात रस नाही, असे त्यांनीच जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App