विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये चुलत भाऊ-बहिणीसारख्या जवळच्या नात्यांमध्ये विवाह होतात. त्यामुळे अनुवांषिक विकारात वाढ होत असून एक पिढीच उध्दवस्त होण्याचा धोका आहे. एका अहवालानुसार ही माहिती पुढे आली आहे.One generation of Pakistan is in danger of collapseGenetic Disorders Rise Due to Intimate Marriages of Cousins
पाकिस्तानातील बहुतांश भागात नात्यांमध्येच लग्न केले जातात. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटींचे लग्नही नात्यातच झाले आहे. यामुळे अनुवांशिक विकार होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानातील जेनेटिक म्युटेशन्सवर आधारित एक अहवाल २०१७ मध्ये प्रसिद्ध झाला होता.
त्यासाठी अनुवांशिक विकारांसाठी जबाबदार असलेल्या म्युटेशन्सना ट्रॅक करण्यात आले होते. नात्यांमधील विवाहांमुळे अनुवांशिक विकार वाढत असल्याचे अहवालातून पुढे आले आहे. पाकिस्तानात थॅलेसेमिया बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अनुवांशिक आजारांची तपासणी करण्यासाठी जेनेटिक टेस्टींग आणि प्री नॅटल स्क्रीनिंगची संख्याही पाकिस्तानात कमी आहे. त्यावर उपचारही बहुतांश रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत.नात्यांमध्ये विवाह करण्यास इस्लामची परवानगी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा नात्यांतील मुला-मुलींचे विवाह होतात. त्यामुळे अनुवांशिक विकारांचे प्रमाण वाढत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App