वृत्तसंस्था
पार्मा : Italy art इटलीच्या उत्तरेकडील पार्मा शहराजवळच्या एका संग्रहालयातून अवघ्या 3 मिनिटांत लाखो डॉलर्स किमतीची तीन चित्रे चोरीला गेली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.Italy art
ही चोरी 22 आणि 23 मार्चच्या रात्री मॅग्नानी रोका फाउंडेशन नावाच्या एका खासगी संग्रहालयात झाली. चोरी झालेल्या चित्रांमध्ये ऑगस्ट रेनुआची ‘फिश’, पॉल सेझानची ‘स्टिल लाइफ विथ चेरीज’ आणि हेन्री मातीसची ‘ओडालिस्क ऑन द टेरेस’ यांचा समावेश आहे.Italy art
स्थानिक माध्यमांनुसार, चोरांनी तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात ही चित्रे उचलली आणि संग्रहालयाच्या बागेतून पळ काढला. याची एकूण किंमत सुमारे 10 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 90-95 कोटी रुपये) असल्याचे सांगितले जात आहे.Italy art
हे फाउंडेशन 1977 मध्ये स्थापन झाले होते आणि त्यात कला इतिहासकार लुइगी मॅग्नानी यांचा संग्रह ठेवण्यात आला आहे. येथे ड्युरर, रुबेन्स, व्हॅन डाइक, गोया आणि मोने यांसारख्या महान कलाकारांच्या कलाकृती देखील आहेत.
स्थानिक माध्यमांनी संग्रहालय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ही चोरी एखाद्या संघटित टोळीने केली आहे. तथापि, अलार्म वाजल्यामुळे चोरी मध्येच थांबली होती. संग्रहालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
ही घटना युरोपमधील मोठ्या संग्रहालयांमध्ये झालेल्या अलीकडील चोऱ्यांनंतर समोर आली आहे. यापूर्वी पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातही चोरांनी सुमारे 101 दशलक्ष डॉलरचे दागिने आणि इतर वस्तू चोरल्या होत्या. दुसऱ्या एका घटनेत चोरांनी अवघ्या 8 मिनिटांत 88 दशलक्ष युरोचे क्राउन ज्वेल्स चोरले होते. नंतर काही संशयित पकडले गेले, परंतु चोरीचा माल अद्याप मिळालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App