विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : ‘सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानने कायमच काश्मीनरी नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. मी काश्मीबरींचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे,’ असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.Imarn Khan targets India
पाकव्याप्त काश्मी्रमधील तथाकथित निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत भाषण करताना इम्रान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.
प्रचारसभेत बोलताना इम्रान खान म्हणाले की, भाजप आणि संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक आहे. ही विचारसरणी केवळ मुस्लिमांनाच नाही, तर शीख, ख्रिस्ती आणि अनुसूचित जमातींना लक्ष्य करते.
काश्मीेरला विशेष अधिकार देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर भारत सरकारने काश्मीयरमध्ये अनेक अत्याचार केले आहेत. मी काश्मी७रींचा ब्रँड अम्बेसिडर बनून सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांची बाजू मांडली आहे. यापुढेही मी हे काम करतच राहिल, असेही इम्रान म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App