विशेष प्रतिनिधी
बीजिंग : टीआनगाँग हे चायनाचे अंतराळातील स्पेस स्टेशनचे नाव आहे. तर जगप्रसिध्द इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स द्वारे देखील अंतराळामध्ये एक स्पेस स्टेशन बनवण्यात आले आहे. त्याचे नाव आहे स्टार लिंक. तर नुकताच चीनने युनायटेड नेशन्सला पत्र लिहून अमेरिकेवर आरोप केले आहेत की, अमेरिकेतील सदस्य असणारे इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीद्वारे चिनी स्पेशन चिनी स्पेस स्टेशनला धोका आहे.
Elon Musk’s satellite was about to collide with China’s space station , China accuses US!
इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकचे सॅटेलाइट जुलैमध्ये आणि मागील ऑक्टोबरमध्ये चायना स्पेस स्टेशन जवळून गेले होते. या घटनेमध्ये जर सॅटेलाईट आणि स्पेस स्टेशनमध्ये टक्कर झाली असती तर चायना स्पेस स्टेशन संपूर्ण नष्ट झाले असते. तसेच त्या स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांना देखील आपला जीव गमवावा लागला असता. अशी तक्रार चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झायलो लीजियन यांनी मंगळवारी युनायटेड नेशन्स कडे केली आहे.
SpaceX Inspiration4 : तीन दिवस अंतराळात घालवून रचला नवा विक्रम, स्पेसएक्सचे चार हौशी अंतराळवीर पृथ्वीवर परतले
त्याने आरोप करताना म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय करारानुसार अमेरिका आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि आमच्या अंतराळवीरांची जीवन धोक्यात घालत आहे. इलॉन मस्क यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया अजुनही दिलेली नाहीये.
तर या सर्व प्रकरणामध्ये हार्वर्ड स्मिथसोनिअन सेंटर ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सचे जोनाथन मॅक्डोवल यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्टार लिंक जेव्हापासून सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून बरेच उपग्रह चीनच्या स्पेस स्टेशन जवळून गेलेले आहेत. नशिबाने कोणतीही हानी आजपर्यंत झालेली नाहीये.
चीनमध्ये इलॉन मस्क हे अतिशय प्रसिध्द आहेत. टेस्ला कंपनीच्या कार चीनमधे प्रसिध्द आहेत. पण चीनने केलेल्या आरोपामुळे आता इराण मस्क यांच्या विरोधात सोशल मिडियावर बहिष्कार टाकला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App